Bird Week will be celebrated with the concept of Vanashree Foundation Sindhudurg and Vivekananda Environment Society
जेष्ठ वन्यजीव अभ्यासक मारूती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जेष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग व विवेकानंद पर्यावरण संस्था यांच्या संकल्पनेतून पक्षी सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त आदर्श गाव ‘केर’ ( ता. दोडामार्ग ) येथे पक्षीमित्र तसेच निसर्गमित्रांच्या उपस्थितीत पक्षी निरीक्षण व माहिती वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते १० वा. जिल्हा परिषद शाळा केर नं.१ च्या परिसरात पक्षी मार्गदर्शक संकेत नाईक यांच्या उपस्थितीत पक्षी निरीक्षण, मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून याचा पक्षीप्रेमीनी लाभ घ्यावा ही विनंती आहे.प्रवेश निःशुल्क असून अधिक महितीसाठी तुषार देसाई 9421623270 यांच्याशी संपर्क साधण्याचा यावं असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दोडामार्ग – वार्ताहर









