सांगली :
महापालिकेच्या वतीने येथील प्रतापसिंह उद्यानामध्ये लवकरच पक्षी संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार असून आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रतापसिंह उद्यान येथील पक्षी संग्रहालय व मनपा अतिथीगृह येथील बांधकाम कामाच्या ठिकाणी भेट देऊन बुधवारी पाहणी केली.
पक्षी संग्रहालय उभारण्यासाठी संबंधित कामे गतीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. शुभम गुप्ता यांनी मनपा क्षेत्रातील बांधकाम सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी अधिकाऱ्यांच्या समवेत केली आहे. सांगली येथील प्रतापसिंह उद्यान येथील पक्षी संग्रहालय नव्याने उभारण्यात येत आहे, बांधकाम प्रगतीवर असून लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना शाखा अभियंता आणि मक्तेदार यांना दिल्या आहेत, मनपा अतिथीगृह येथील बांधकाम कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून सदरचे कामाची माहिती आयुक्त यांनी घेतली आहे. सूचना शाखा अभियंता आणि मक्तेदार यांना देऊन सदरचे काम मुदतीत पूर्ण करणे कामी नियोजन करणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने वेळेचे नियोजन करणे बाबत सूचित केले आहे. यावेळी उपस्थित प्रभारी शाखा अभियंता ऋतुराज यादव, संबंधित मक्तेदार व स्वच्छता निरीक्षक उपस्थितीत होते. यावेळी मनपा प्रशासनाच्या वतीने संबंधित कामाच्या ठिकाणी बांधकामाचाही आढावा घेण्यात आला.








