Bipasha Basu :अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी अखेर त्यांच्या मुलीचा चेहरा जगासमोर उघड केला. देवी असे तिचे नाव. बिपाशाने देविचा फोटो शेअर करत मी देवी आहे असे कॅप्शन लिहले आहे. तसेच देवीने घातलेल्या गुलाबी फ्रॉकवर ‘डॅडीज प्रिन्सेस’ असे शब्द छापलेले आहेत. पलंगावर हसत-खेळत असलेली बेबी डॉल देवी खुपच सुंदर दिसतेय. देवीला पाहून अनेकांनी आशीर्वादासह कौतुक केले आहे. तसेच ‘करण सिंग ग्रोवर की कार्बन कॉपी’अस चाहत्यांनी म्हटलय.
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले.या जोडप्याने नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांच्या मुलीचे स्वागत केले आणि संयुक्त घोषणा केली.त्यावेळी त्यांनी तिचे नाव देवी आहे अस पोस्टमध्ये लिहलं होते. “देवी बसू सिंग ग्रोव्हर, असे नाव लिहले होते.यानंतर त्यांनी देवीसोबत फोटो शेअर केले मात्र, तिचा चेहरा दाखवला नव्हता अखेर आज तिचा चेहरा बिपाशाने जगासमोर आणला.
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर या दोघांनी भूषण पटेलच्या डेंजरस (2019) नावाच्या वेब सीरिजमध्ये एकत्र काम होते आणि त्यापूर्वी त्यांनी अलोन (2015) मध्ये काम केले होते. करण सिंग ग्रोव्हर पुढे सिद्धार्थ आनंदच्या फायटरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत आणि जानेवारी 2024 मध्ये रिलीज होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









