गेट्स फाउंडेशनच्या ‘बोर्ड ऑफ ट्रस्टीज’च्या बैठकीचे औचित्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स लवकरच भारत दोऱ्यावर येणार आहेत. बिल गेट्स यांनी स्वत:च ‘लिंक्डइन’वर यासंबंधीची घोषणा रविवारी केली. या पोस्टमध्ये त्यांनी तीन वर्षांत तिसऱ्यांदा भारताला भेट देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांची ही भेट ग्लोबल साउथमधील गेट्स फाउंडेशनच्या ‘बोर्ड ऑफ ट्रस्टीज’च्या बैठकीदरम्यान होणार आहे. या भेटीदरम्यान आरोग्य सेवा, शेती आणि डिजिटल परिवर्तनाच्या क्षेत्रात भारताने ऐतिहासिक भूमिका बजावण्यावर भर दिला जाणार आहे.
गेट्स फाउंडेशन गेल्या दोन दशकांहून अधिक काळ भारतात काम करत आहे. हे काम भारत सरकार, संशोधक आणि उद्योजकांनी एकत्रितपणे विविध क्षेत्रात पुढे नेले आहे. गेट्स फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाची बैठक पहिल्यांदाच ग्लोबल साउथमध्ये होत आहे. या टप्प्यासाठी भारत हे सर्वात योग्य ठिकाण असल्याचे वक्तव्य बिल गेट्स यांनी स्वत: केले आहे.









