Bilkis Bano : संपुर्ण देशभरात चर्चिल्या गेलेल्या बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले होते. त्यावर काही महिन्यांनी बिल्किस बानो यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून मुक्त झालेल्या 11 दोषींच्या माफीला आव्हान दिले आहे.
2002 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 11 दोषींची सुटका त्यांच्या शिक्षे आधीच करण्यात आली. आरोपींची लवकर सुटका झाल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळून सराकारवर टीका झाली. तसेच गुजरात सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या. बिल्किस बानोच्या वकिलांनी या शिक्षेच्या माफीला आव्हान देणारी रिट याचिका दाखल सर्वोच्च न्यायालयात दाकल केली आहे.
बिल्किस बानो यांच्यावर 2002 च्या गुजरात दंगलीत सामूहिक बलात्कार झाला होता. तसेच तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या देखील झाली होती. या प्रकारणातील 11 जणांना दोषी ठरवण्यात येऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. गुजरात सरकारने त्यांची शिक्षा पुर्ण होण्याआधीच ‘चांगली वर्तणुक’ या कारणांनी त्यांना माफी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









