प्रतिनिधी
बांदा
मुंबई गोवा महामार्गांवर बांदा – सटमटवाडी येथे अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन फरफटत नेल्याने दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ (रा. डेगवे) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.









