वाकरे। प्रतिनिधी
खुपीरे (ता. करवीर) येथील मिल्क बल्क सेंटरमधील दूध वाहतूक करणाऱ्या टँकरने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलवरील युवक जागीच ठार झाला.शुक्रवारी सकाळी आठ वाजता साबळेवाडी रस्त्यावर हा अपघात झाला.कृष्णात खेमराज बेगडा (वय ३०) मूळ गाव रत्नागिरी, सध्या रा. महादेव प्रसाद हॉटेल , दोनवडे ता. करवीर असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी की मृत युवक महादेव प्रसाद हॉटेल, दोनवडे येथे स्वयंपाकी म्हणून काम करत होता.शुक्रवारी सकाळी तो खुपीरे ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या मावस भावाकडे आला होता. सकाळी ८ च्या सुमारास तो दोनवडे येथील हॉटेलकडे निघाला असता साबळेवाडी मार्गे कोल्हापूरकडून खुपिरेकडे येणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या टँकरने (एम.एच. ०९ जीजे ४१४९) त्याला समोरासमोर धडक दिली.या अपघातात तो जागीच ठार झाला.टँकर चालक पळून गेला असून पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








