खांडेपार पुलाच्या सर्व्हीसरोडजवळ अपघात : मयत सातपाल साकोर्डें वनखात्याचा कर्मचारी
प्रतिनिधी /फोंडा
फेंडा-बेळगाव महामार्गावरील कपेलवाडा उसगाव येथे मिनी पिकअपने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश लाडको गावकर (55, वाघोण दाभाळ) असे त्याचे नाव आहे. सदर अपघात काल रविवारी रात्री 8 वा. सुमारास घडला खांडेपार पुलाच्या सव्हीसरोड जवळ घडला.
फेंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत प्रकाश आपल्या दुचाकी एक्टीवा जीए 12 बी 3850 उसगावहून फोंडय़ाच्या दिशेने येत होता. उसगांवहून फोडय़ाच्या दिशेने जाताना कपेल समोरील पीर दरग्याजवळून जाणाऱया सर्व्हीस रोडने जावे की खांडेपार पुलाच्या नवीन उड्ढानपुलावरून जावे अशा मनस्थितीत असताना पाठीमागून येणाऱया अंडीवाहू टाटा नेक्सोन जीए 05 टी 4268 पिकअपने त्याला पाठीमागून ठोकरले व सुमारे 30-40 मिटर दुचाकीसह फरफटत नेले. यावेळी त्याचे डोके टेम्पोच्या पुढील चाकाखाली सापडल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. फोंडा उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला असून उपनिरीक्षक सुरज काणकोणकर अधित तपास करीत आहे.
प्रवास नको म्हणून क्वाटर्सवर रहायचा नेमका अपघाताने डाव साधला
मयत प्रकाश गावकर हा सातपाल साकोर्डे येथे वनखात्याचा कर्मचारी आहे. त्याचे मूळ घर वाघोण येथे असून त्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. कामानिमित्त घरून ये-जा करण्याऐवजी तो सातपाल येथील सरकारी क्वाटर्समध्येचे राहत होता. महिन्याभरानंतर किंवा सुट्टीrच्या दिवशी तो घरी जात असे. तो वाहनातून रात्री अपरात्री प्रवास करावा लागू नये म्हणून क्वाटर्समध्ये राहत होता मात्र नेमक्या वाहनाच्या अपघातात त्याचा दुर्देवी अंत झाल्याने वनखात्याचे अधिकारीही हळहळ व्य़क्त करीत आहेत. याप्रनरणी मांडवी हेचरीसच्या केंबडी व अंडीवाहू पिकअपचा चालक सचिन सुरेश खराडे (42, मूळ शिरोळ-कोल्हापूर) यांच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन वाहून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.









