इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील स्टेशन रोडवरील राज्य विद्युत पारेषण महामंडळाच्या केंद्रानजीक अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी तरुणाचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यु झाला. नागेश दौलतराव काळे (वय 43, रा. कारंडे मळा, इचलकरंजी) असे त्यांचं नाव आहे. हा अपघात बुधवारी रात्री उशिरा झाला आहे.
मृत काळे अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर रस्त्याच्याकडे गंभीर जखमी होऊन पडले होते. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. पण त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारा करीता सांगलीला नेत होते. यावेळी त्यांचा वाटेतच मृत्यु झाला .








