मालवण- वार्ताहर
वायरी साई माऊली हॉटेलजवळील विद्युत खांबाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर उर्फ गोटया बाबाजी मसूरकर (४२. रा. वायरी भूतनाथ) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर मसुरकर हा फॅशन मोटरसायकलने मालवणहून वायरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी वायरी साई माऊली हॉटेल जवळील विद्युत खांबाला त्याची धडक बसली. या अपघातात मसूरकर हा गंभीररित्या जखमी झाला. दीपक ढोलम, मनोज झाड, मंदार बोडवे, अवि सामंत यांनी त्याला रिक्षेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Previous Articleमनपा आयुक्तसाहेब, मला न्याय द्या!
Next Article बँक व्यवस्थापकच पडला फशी!









