वार्ताहर /किणये
पहलगाम,जम्मू काश्मीर येथे झालेल्या आतंकवाद्यांच्या क्रूर हल्ल्याच्या निषेधार्थ मच्छे गावात रविवारी सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच देशात झालेले या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. रविवारी सकाळी मच्छे येतील मुख्य बस थांब्याजवळून या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. आतंकवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला या निषेदाचे फलकही अनेकांनी आपल्या हातात घेतले होते. तसेच प्रत्येकाच्या दुचाकीवर भगवे ध्वज लावण्यात आले होते.
भैरवनाथनगर, लक्ष्मीनगर, हवळनगर, धर्मवीर संभाजी महाराज नगर, श्री नगर, हुंचेनहट्टी क्रॉस या भागातून ही बाईक रॅली पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मच्छे येथील विविध गल्ल्यातून रॅली काढण्यात आली. मच्छे नगरपंचायती जवळ या बाईक रॅलीची सांगता करण्यात आली. नगरपंचायतीजवळ विनायक चौगुले, संतोष जैनोजी ,विनायक पाटील, भरमा तळवार, सुरेश लाड, दीपक होनगेकर आदींची या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करणारी भाषणे झाली. बाईक रॅलीमध्ये मच्छे गावातील विविध संघटनातील तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.









