नवी दिल्ली
पॅकेजयुक्त खाद्यपदार्थ (स्नॅक्स) बनवणाऱया बिकाजी फूडस्चा आयपीओ येत्या गुरुवारी 3 नोव्हेंबर रोजी बाजारात खुला होणार आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी येणाऱया काळात 882 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती आहे. 285 ते 300 रुपये प्रति समभाग अशी किंमत ठेवण्यात आली आहे. सदरचा आयपीओ 7 नोव्हेंबरला बंद होणार आहे. कंपनीने 2022 आर्थिक वर्षात 1610 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.









