समभागांनी मोडला मागील 52 आठवड्यातील विक्रम
नवी दिल्ली
बिकाजी फूड्स इंटरनॅशल लिमिटेड यांनी बुधवारी भुजियालालजी प्रायव्हेट लिमिटेडमधील 49 टक्क्यांची हिस्सेदारी आणि 396 कंपल्सरी कन्व्हर्टिबल डिबेंचर्सचे (सीसीडी) अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीने बीएसईला सादर केलेल्या अहवालात दिली आहे.
सदरच्या व्यवहारांमध्ये 5,100 रुपये प्रति सिक्युरिटी मूल्याच्या आधारे 9,608 इक्विटी समभाग आणि 396 सीसीडी यांचा समावेश आहे. ज्याची एकूण किंमत ही 5.10 कोटी रुपये आहे. अधिग्रहणाच्या बातमीच्या परिणामामुळे शेअरबाजारात बिकाजी फूड्स इंटरनॅशनलच्या समभागाने तब्बल मागील 52 आठवड्यांचा विक्रम मोडित काढत नवा उच्चांक प्राप्त केला आहे.









