Shrad Pawar On Bihar Political Crisis : बिहारमध्ये सत्तांतराचे वेध गेल्या एक आठवड्य़ापासून लागले होते. सत्ताधारी भाजप आणि नितीश कुमार यांचा संजद या पक्षांमध्ये मतभेद उफाळून आला अन् काल त्यांनी भाजपसोबत असलेली युती तोडून मोठा धक्का दिला आहे. एकीकडे महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार आणि दुसरीकडे बिहारात झालेला सत्तापालट झाल्याने अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मोठं विधान केले आहे. भाजप त्यांच्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतो असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील हल्लाबोल केला आहे.
शरद पवार म्हणाले की, वेळीच सावध होत नितीश कुमारांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे.भाजपा मित्रपक्षांना दगा देतं ही नितीश कुमारांची तक्रार होती. शिवसेनेवरही भजपाने आघात केला.धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचचं असून शिंदे गटाचं नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना ते म्ङणाले, “प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाही आणि आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील, असं विधान भाजपाकडून करण्यात आलं. यातून नितीश कुमार यांनी केलेली तक्रार स्पष्ट होते.”असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








