वृत्तसंस्था / पाटणा
नोकरभरती प्रक्रियेत कोणताही घोटाळा होऊ नये, या उद्देशाने बिहार सरकारने विधानसभेत एक विधेयक संमत करुन घेतले आहे. नोकरभरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढीस लागले आहेत. त्यामुळे या परीक्षांची आणि नोकरभरती प्रक्रियेची विश्वासार्हता प्रभावित झालेली आहे. प्रश्नपत्रिका फुटू नयेत आणि नोकरभरतीत भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी बिहार पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स) बिल, हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले होते. बिहारचे विधिमंडळ व्यवहार मंत्री विजय कुमार चौधरी यांनी ते मांडले होते. ते संमत होण्याच्या वेळेला विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे ते ध्वनिमताने संमत करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.









