वृत्तसंस्था / बिहार
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरूषांच्या उंचउडी टी-64/42 प्रकारात शैलेश कुमारने यजमान भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्याबद्दल भारतात त्याचे सर्वत्र कौतुक होत असुन त्याला बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्य क्रीडा पुरस्कार योजनेअंतर्गत 75 लाख रुपये व प्रशस्तिपत्र देण्याचे जाहीर केले.









