ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar)यांनी भाजपला धक्का देत तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससोबत (Congress) हात मिळवणी केली. त्यामुळे नितीश कुमार यांनी भाजपला धक्का देत त्यांचे ऑपरेशन लोटस हाणून पाडलं. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज १६ ऑगस्टला होणार आहे. तसेच ३१ मंत्री शपथबद्ध होणार आहेत.
नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात महागठबंधनमधील विविध पक्षांचे नेते आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या मंत्रीमंडळ विस्तारात एक-दोन वगळता यापूर्वी असलेली सर्व खाती नितीश कुमार यांच्या पक्षाकडे कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच राजद पक्षाला एकूण १५ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला २ तर जदयू पक्षाला १२ मंत्रीपदे दिली जातील, असे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : ‘वंदे मातरम्’ आदेशावरून मुनगंटीवारांचा यूटर्न
तर डाव्या विचारसरणीच्या सीपीआय (एमएल) ने १२ आमदारांसह राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारला बाहेरून पाठिंबा जाहीर केला आहे, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने रविवारी सांगितले की, सीपीआयला मंत्रिमंडळात संधी मिळाली तरच पक्षाला सन्माननीय प्रतिनिधित्व मिळेल. नितीश कुमार यांच्या सन्माननीय प्रतिनिधित्वच्या मंत्रिमंडळात सामील होऊ इच्छितो. नितीश कुमार २४ ऑगस्टला विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. १० ऑगस्ट रोजी महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घेत सात पक्षांच्या महागठबंधनसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.









