लोकमान्य चषक वरिष्ठ फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेच्या शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून फॅन्को एफसीने शिवाजी कॉलनीचा तर युनायटेड युथने मोहब्ल्यू संघाचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळवले. स्पोटिंग प्लॅनेट मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात फॅन्को एफसीने शिवाजी कॉलनीचा 7-0 असा पराभव केला. या सामन्यात 15 व 30 व्या मिनिटाला फॅन्कोच्या ओमकार भेकणेने सलग दोन गोल केले. 10 व 25 व्या मिनिटाला महिंद्र मर्डीने सलग 2 गोल करून 4-0 ची आघाडी मिळवून दिली. 36 व्या मिनिटाला इब्राहिम बेपारीने पाचवा गोल केला. 35 व्या मिनिटाला रवी कोपदने सहावा गोल केला. 38 व्या मिनिटाला यासीन बेपारीने सातवा गोल करून 7-0 आघाडी मिळवून दिली. या सामन्यात शिवाजी कॉलनी संघाला गोल करण्यात अपयश आले.
दुसऱ्या सामन्यात युनायटेड युथ एफसीने मोहब्लू संघाचा 10-0 अशा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात सातव्या मिनिटाला युनायटेड युथच्या नेतन पिंटोच्या पास वर स्टीवन हरर्लाने पहिला गोल केला. 12 मिनिटाला स्टीवनच्या पासवर राहुल शिरूरने दुसरा गोल केला. 18 व्या मिनिटाला सुजल गावडेच्या पासवर नेतन पिंटोने तिसरा गोल केला. 24 व 26 व्या मिनिटाला राहुल पंतोजीच्या पासवर सुजल गावडेने सलग दोन गोल करून पहिल्या सत्रात 5-0 आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 37 व्या मिनिटाला शिवमच्या पासवर राहुल पंतोजीने सहावा गोल केला. 45 मिनिटाला सुजल गावडेने सातवा गोल केला. स्टीवन हुरर्लाने आठवा गोल गेला. 60 व्या मिनिटाला राहुल शिरोरने नवा तर 61 व्या मिनिटाला राहुल पंतोजीने दहावा गोल करून 10-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात मोहब्ल्यू संघाला गोल करण्यात अपयश आले.









