सावंतवाडी / प्रतिनिधी
Big water fell in the toilet tank!
डेगवे मयूरवाडी येथे राहणाऱ्या सडवेलकर कुटुंबियांच्या घराच्या संडासच्या टाकीत भलामोठा गवारेडा पडल्याची घटना आज घडली . सडवेलकर कुटूंबियांनी तात्काळ वनविभागाला कळवले . त्यानंतर वनपाल अनिल मेस्त्री ,वनसंरक्षक देसाए व त्यांची टीम घटना स्थळी दाखल झालीये .सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर हेदखील घटनास्थळी दाखल होणार आहेत . व जेसीपीद्वारे गवारेड्याला टाकीतून बाहेर काढण्यात येण्यात येणार आहे . माजी उपसरपंच तथा भाजप तालुका सरचिटणीस मधुकर देसाई हे वनक्षेत्रपाल क्षीरसागर यांना निवेदन देणार आहेत . अलीकडच्या काळात वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीत वाढला आहे . आणि अशा घटनांमध्येही वाढ होते आहे .अशा घटना वारंवार होत असतील तर वनविभागाकडे रेस्क्यू टीम असणे आवश्यक आहे जेणेकरून अशी घटना घडली तर तात्काळ त्यावर मार्ग निघेल . देसाई यांनी सांगितले की आम्ही वनमंत्र्यांना देखील यासंदर्भात निवेदन देणार आहोत . घटनास्थळी डेग्वे सरपंच राजन देसाई ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई उपस्थित होते.









