खोळंबलेल्या एसटी बस आज मार्गस्थ झाल्याचा परिणाम
खेड /प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतल्याने आरक्षित बस कोकणात मार्गस्थ होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे खोळंबलेल्या एसटी बस बुधवारी रात्रीपासूनच कोकणात डेरेदाखल होत आहेत. शिवाय हजारो वाहनांची वर्दळ महामार्गावर सुरू आहे. परिणामतः गुरुवारी सकाळी रायगड जिल्ह्यातील कोलाड, लोणेरे ते कशेडी पर्यंतचा महामार्ग पुरता वाहतूक कोंडीत अडकला होता. गणेशभक्त मोठ्या संख्येने गावाला निघाले आहेत.
Previous Articleशाळेत चोरी…कबुलीसाठीचा प्रकार अघोरी
Next Article वृत्तपत्र विक्रेत्यांना कामगारांचा दर्जा द्यावा








