शेकडो छोटे आणि स्थानिक विपेते बनले लखपती
वृत्तसंस्था/ बेंगळूर
ऍमेझॉन इंडियाने त्यांच्या महिनाभर चालणाऱया ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (जीआयएफ) 2022 मध्ये ही घोषणा केली की त्यांचा हा फेस्टिव्हल हा विपेते आणि ब्रॅन्ड पार्टनर्सकडून ऍमेझॉन डॉट इन वरील हे सर्वांत मोठे सेलिब्रेशन ठरले आहे. यामुळे देशभरातील कोटय़ावधी ग्राहकांच्या चेहऱयावर हास्य झळकले आहे. जीआयएफ 2022 ची सुरुवात ही 22 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून प्राईम अर्ली ऍक्सेसनुसार तर सामान्य जनतेसाठी 23 सप्टेंबरपासून करण्यात आली होती. ग्राहकांनी ऍमेझॉनडॉटइन वरील विपेत्यांच्या कोटय़वधी उत्पादनांना प्रतिसाद दिला. तसेच लाखो छोटय़ा आणि मध्यम व्यावसायिक (एसएमबीज) च्या उत्पादनांनाही उत्तम प्रतिसाद दिला.

“ग्राहकांना तसेच विपेत्यांना सणासुदीच्या दिवसात सेवा देताना आम्हाला आनंद होत आहे. छोटे आणि मध्यम आकाराचे व्यवसाय, स्टार्ट अप्स, हस्तकलाकार आणि महिला व्यावसायिकांनी त्यांच्या उत्पादनांना संपूर्ण भारतातील ग्राहकांसमोर सादर केले. प्राईम सदस्यांची नोंदणी अधिक प्रमाणात केल्याचा विशेष करून टिअर 2 आणि 3 शहरांतील ग्राहकांशी जोडणी केल्याचा आनंद वाटतो. ग्राहक हे ऑनलाईन शॉपिंग करता ऍमझॉनला प्राधान्य देतात याचे हे द्योतक आहे.’’ असे कंट्री मॅनेजर मनीष तिवारी यांनी सांगितले.









