भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांना मोठा धक्का बसला आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) माजी खासदार डी. श्रीनिवास ( D. Srinivas ) यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत जवळपास नऊ वर्षांनी पुन्हा आपल्या स्वगृही काँग्रेसमध्ये (Congress) परतले आहेत. तेलंगणा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे प्रमुख ए. रेवंत रेड्डी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत आपला मुलगा धरमपुरी संजय यांच्यासह पक्षात प्रवेश केला. डी. श्रीनिवास, ज्यांचा दुसरा मुलगा डी. अरविंद निजामाबादमधून भाजपचे खासदार आहेत.
डी. श्रीनिवास, यांनी 2004 आणि 2009 मध्ये कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राहुल गांधी यांच्या लोकसभेतून अपात्र ठरल्याच्या निषेधार्थ ते ‘सत्याग्रह’ आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी यापुर्वीच जाहीर केले होते. “राहुल गांधी हे माझे नेते आहेत. त्याच्याकडे खासदार होण्याची पात्रता नाही असे कसे म्हणता येईल? त्यांच्या कुटुंबाने केलेले बलिदान आणि त्यांचा अनुभव पाहता, तुम्ही त्याच्या पात्रतेवर शंका घेऊ शकत नाही. मी आज पक्षात प्रवेश करत आहे. मी त्यांच्या सुरू असलेल्या निषेधाचा एक भाग असेन.”असे त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.
त्यांचा मुलगा डि. अरविंद यांच्यावर आपल्या वडिलांची प्रेस रिलीझवर स्वाक्षरी घेउन ते कॉंग्रेसमध्ये सामिल होणार नाहीत असे जाहीर केल्याचा आरोप केला गेल्याने गोंधळ निर्माण झाला होता. मात्र गांधी भवनात माजी आंध्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डि. श्रीनिवास यांचे आगमन झाल्यावर यांचे ज्येष्ठ नेते के. जना रेड्डी, कोमातीरेड्डी वेंकट रेड्डी, एन. उत्तम कुमार रेड्डी, व्ही हनुमंथा राव, पोन्नाला लक्ष्मय्या यांनी स्वागत केले.









