मराठी भाषिकांनी समितीच्या झेंड्याखाली येणे काळाची गरज : राष्ट्रीय पक्षांमध्ये गेलेल्या मराठी भाषिकांना साद
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार समाजसेवक रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये गेलेल्या मराठी भाषिकांनी माय मराठीच्या अस्मितेसाठी, जाती-धर्म, भाषा, भेद न करता बहुजनांच्या कल्याणाकरिता समितीच्या झेंड्याखाली एकत्र येणे काळाची गरज आहे. ही जाण मराठी भाषिकांनी ठेवावी आणि समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना बहुमताने निवडून आणावे, असे आवाहन माजी नगरसेवक अनिल पाटील यांनी केले. म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या हिंदवाडी परिसरातील प्रचारसभेत ते बोलत होते. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत माजी नगरसेविका अश्विनी जांगळे, पार्वती भातकांडे, श्रीधर पाटील, अशोक नार्वेकर, प्रकाश पाटील, मोहन गुणाजी, भाग्यश्री पाटील, शिवानी पाटील, श्रेया पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी उपमहापौर रेणू मुतगेकर व संजय शिंदे, माजी नगरसेवक अनिल पाटील यांनी रमाकांत कोंडुस्कर यांचे जल्लोषात स्वागत करून शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. यावेळी आनंद गोगटे, अशोक हणमंताचे, रवी भट, विनायक जाधव, अंकुश केसरकर, विजय भोसले, सतीश पाटील, सुनील बोकडे, बाळू जोशी, विजय हलगेकर, किरण परब, माजी नगरसेवक हलगेकर यांच्यासह समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, महिला मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदवाडी येथून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. पदयात्रा सराफ कॉलनी, आदर्श नगर, मेहकर कॉलनी, घुमटमाळ मंदिर परिसर, व•र छावणी, युवा सेना विभाग परिसर, आदर्शनगर, गुरुद्वार समाजाचे गोवावेस येथील मेघदूत कॉलनी या ठिकाणी प्रचारफेरी काढण्यात आली. गोवावेस या ठिकाणी सांगता करण्यात आली. यावेळी सुभाष मार्केट गणेशोत्सव मंडळ, गोवावेस येथील गुरुद्वारा शीख समाज, घुमटमाळ मंदिर ट्रस्ट, नार्वेकर समाज, युवा समिती, युवा सेना संघटना, आदर्शनगर युवक मंडळ, मेघदूत कॉलनी सामाजिक संघटना, हिंदवाडी कुस्तीगीर संघटना, गणेश उत्सव मंडळ हिंदवाडी, गुरुद्वारा सामाजिक संघटना, महिला मंडळांच्यावतीने भरघोस पाठिंबा जाहीर करण्यात आला. चौकाचौकातील फलकांवर रमाकांत कोंडुस्कर यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. भगव्या टोप्या, भगवे झेंडे व भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. घरांसमोर रांगोळ्यांनी विशेष स्वागत करण्यात आले.
कोंडुस्कर यांची आज भवानीनगर, चन्नम्मानगर परिसरात पदयात्रा
म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ सोमवार दि. 1 मे रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ गुरुप्रसाद कॉलनी, भवानीनगर, वाटवे कॉलनी, कावेरीनगर, पार्वतीनगर, जैतनमाळ, चन्नम्मानगर येथील सर्व क्रॉस फिरून सुभाषचंद्र नगर येथून हिंदुनगर येथे सांगता होणार आहे. पदयात्रेत आजी-माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या मजगावात पदयात्रा
म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा आता अंतिम टप्प्यात आली असून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. मंगळवार दि. 2 मे रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ मजगावच्या वेशीतील विठ्ठल रखमाई मंदिर येथून होईल. त्यानंतर मजगावातील सर्व गल्ल्या फिरून ज्ञानेश्वर नगर, कलमेश्वर नगर, रोहिदास कॉलनी, रायण्णा नगर, राजाराम नगर, देवेंद्र नगर, महावीर नगर, ब्रह्मनगर परिसर फिरून सांगता होईल. पदयात्रेत आजी-माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









