पात्र संस्थांना आरक्षित समभागांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) च्या आयपीओसाठी पात्र संस्थांत्मक खरेदीदार (क्यूआयबी) साठी आरक्षित समभागांची खरेदी करण्याची सोमवारी शेवटची संधी होती. एलआयसी आयपीओला सकारात्मक असा मजबूत प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दुपटीपेक्षा अधिकचा प्रतिसाद मिळाला आहे.
शेअर बाजारातील उपलब्ध माहितीनुसार ही स्थिती दुपारी 12 वाजून 12 मिनिटांवेळची आहे. यावेळी जवळपास 3,95,31,236 राखीव प्राथमिक समभागांसाठी 4,61,62,185 बोली मिळाल्या असून हा आकडा 1.17 पट प्रतिसाद दर्शवत आहे. बिगर संस्थांत्मक गुंतवणूकदारांच्या हिस्स्यासाठी 1.38 पट प्रतिसाद मिळाला आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांच्या राखीव 6.9 कोटी समभागांसाठी 11.89 कोटी बोली मिळाल्या आहेत.
अन्य घडामोडी
w पॉलिसीधारकांच्या हिस्स्याला 5.39 पट तर कर्मचाऱयांसाठीच्या हिस्सेदारीला चार पट प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. एलआयसी आयपीओला एकंदरित 2.05 पट प्रतिसाद मिळाला. यामध्ये 16,20,78,067 प्रारंभिक समभागांसाठी 33,19,04,280 बोली मिळाल्या आहेत.









