ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आयकराची मर्यादा आता 5 लाखांवरुन 7 लाखांवर नेण्यात आली आहे. त्यामुळे 7 लाखांपर्यंचे उत्पन्न असणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
अशी असेल कररचना
उत्पन्न प्राप्तिकर
0 ते तीन लाख 0 टक्के
3 ते 6 लाख 5 टक्के
6 ते 9 लाख 10 टक्के
9 ते 12 लाख 15 टक्के
12 ते 15 लाख 20 टक्के
15 लाखांहून अधिक 30 टक्के









