Hasan Mushrif vs Kirit Somaiya : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 24 मार्चपर्यंत कारवाई न करण्य़ाचे निर्देश उच्च न्यायालयाचे ईडीला दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्यांना न्यायालयीन प्रक्रियेची प्रत कशी मिळाली असेही कोर्टाने विचारले आहे.तसेच सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर गेल्या दोन महिन्यांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. सहकारी कारखान्यासाठी पैसे गोळा करुन ते वैयक्तिक कामासाठी वापरल्याचा ठपका मुश्रीफांवर ठेवण्यात आला. कारखान्यासाठी प्रलोभने दाखवून शेअर्स गोळा करत फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनी ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.याबाबात मुरगुड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
Previous Articleशरीरासाठी लाभदायक असणारी काकडी
Next Article बारामतीत 2.5 लाखांची लाच घेताना शिक्षक अटकेत









