नवी दिल्ली
: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना अल्पवयीनाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी अल्पवयीन कुस्तीपटू आणि तिच्या वडिलांनी स्वत:चा जबाब नेंदविला आहे. दिल्ली पोलिसांकडून दाखल अहवालावर आमचा कुठलाच आक्षेप नसल्याचे या दोघांनी म्हटले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश छवि कपूर यांच्यासमोर अल्पवयीन कुस्तीपटूने स्वत:चा जबाब नोंदविला आहे.









