Satara News : पुणे कोल्हापूर महामार्गावर उंब्रज येथे दुधात भेसळ करणाऱ्या टोळीला एलसीबीने आज पकडले. यामुळे दुधात भेसळ करून भेसळयुक्त दूध विकणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे कोल्हापूर महामार्गावर उंब्रज मध्ये दुधात भेसळ करून डेअरीला दूध घालणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. यानुसार आज साताऱ्यातील उंब्रज येथील या टोळीचा पर्दाफाश करण्यात एलसीबीला यश आले. लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्याने यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









