वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानमधील भटक्मया-विमुक्त कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष गोपाळ केसावत यांना शनिवारी जयपूरमध्ये एसीबीने सापळा रचून अटक केली आहे. ‘आरपीएससी’मध्ये भरतीच्या नावाखाली लाचेखातर 7.50 लाख ऊपये स्विकारताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. एसीबीच्या या कारवाईमुळे राजस्थानमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत भाजपने गोपाळ केसावत यांचा राहुल गांधींसोबतचा फोटो शेअर केला आहे. याप्रश्नी विरोधी पक्षाचे उपनेते सतीश पुनिया यांनी सरकारला सवाल केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सीकर युनिटने गोपाळ केसावत यांच्यावर ही अटकेची कारवाई केल्याचे एएसपी बजरंग सिंह शेखावत यांनी सांगितले. ‘आरपीएससी’मध्ये भरतीच्या नावाखाली पैसे घेतले जात असल्याची तक्रार काही व्यक्तींनी केली होती. अनिल आणि ब्रह्मप्रकाश यांनी 18.50 लाख ऊपये घेतले आणि त्यानंतर रवींद्र नावाच्या तिसऱ्या व्यक्तीने गोपाळ केसावत यांना 7.5 लाख ऊपये स्विकारताना त्यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. त्यात 500 आणि 200 ऊपयांच्या नोटा आहेत. कारवाई करण्यात येत आहे. भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत काँग्रेसचे चारित्र्यच भ्रष्टाचाराने डागाळलेले असल्याचा आरोप केला आहे.









