Big landslide on the right canal of Tilari Dam
तिलारी धरणाच्या उजव्या कालव्याला घोडगेवाडी भटवाडी येथे मोठे भगदाड पडल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी स्थानिक नागरिकांनी याबाबत संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे देत प्रत्येक जण हा विभाग आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत दुर्लक्ष केल्याने भगदाड पडल्याच्या घटनेच्या चार ते पाच तासानंतरही कालव्यातील पाणीपुरवठा बंद केला नव्हता.
कालव्याला भगदाड पडल्याची माहिती मोर्ले ग्रामपंचायत सदस्य संतोष मोर्ये, भटवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ प्रमोद नाईक,रामदास नाईक यांनी पाटबंधारे खात्याला तसेच पत्रकारांना दिली त्यानंतर पत्रकार घटनास्थळी पोहचले मात्र संबंधित अधिकारी पोहोचले नाहीत आणि कालव्यातील पाणीपुरवठा ही बंद न केल्याने या शेतकऱ्यांनी या बेजबाबदार अधिकाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
साटेली भेडशी प्रतिनिधी









