शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील गगनबावडा आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मौजे संखमध्ये ग्राम न्यायालय होण्याची घोषणा करण्यात आली. 2019 मध्ये दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ग्राम न्यायालये स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘ग्राम न्यायालय’ स्थापन करण्याचे निर्देश मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सर्व उच्च न्यायालयांकडून उत्तर मागवले होते.जलयुक्त शिवार अभियान,शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना अशा अनेक योजनांची आज घोषणा करण्यात आली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
-जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार. (मृद व जलसंधारण विभाग)
-जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. २२२६ कोटी सुधारित खर्चास मान्यता. (जलसंपदा विभाग)
-आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार. (आदिवासी विभाग)
-खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड. राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणार. (रोजगार हमी योजना)
-गगनबावडा आणि जत तालुक्यात मौजे संख येथे होणार ग्राम न्यायालय. (विधि व न्याय विभाग)
-शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना. नाममात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क आकारणारा. (महसूल विभाग)
-राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार. कोकणातील शेतकऱ्यांना होणार फायदा.(कृषि विभाग)
-शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ. वाचनसंस्कृतीला मिळणार बळ. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
-कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणार. कालबाह्य तरतुदी काढणार. कारावासाऐवजी वाढीव दंडाची तरतूद. (कामगार विभाग)
-१३ सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कम अदा करणार. (सहकार विभाग)
-पुणे जिल्ह्यातील आंबेगांव बु. येथील शिवसृष्टी प्रकल्पास ५० कोटी अनुदान देणार. (पर्यटन विभाग)
-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार. (सामान्य प्रशासन विभाग)
-पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, कर्जत या स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठांना मान्यता. (उच्च व तंत्रशिक्षण )
-महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी. ईज ऑफ डुईंग बिझिनेसाठी निर्गुन्हेगारीकरण करणार. (गृह विभाग )
-राज्यातील शाळांना अनुदान. ११०० कोटींना मान्यता. (शालेय शिक्षण)
-महाअधिवक्ता श्री आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत. (विधी व न्याय)
Next Article रजपूतवाडीजवळील अपघातात दगड घडीव कामगार जागीच ठार
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.