मुंबई: राज्यात युतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर जनहीताचे धडाधड निर्णय घेतले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधीच मोठ्या घोषणा केल्या होत्या. दरम्यान आताही त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना दिलासा मिळाला आहे. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याचे सांगितले. (Maharashtra Fuel Price News in Marathi)
यावेळी बोलताना त्यांनी मविआवर निशाणा साधला ते म्हणाले, गेल्य़ा काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधन दर कपात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा- विशाळगडावरील बुरुज ढासळला; लोखंडी जिन्यावरील वाहतुक बंद
शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोल डिझेल VAT कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये डिझेल प्रतीलिटर तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Previous Articleअसंसदीय शब्दांवरून विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
Next Article काळम्मावाडी धरण ५१ टक्के भरले








