महिलांनाही मिळणार समान मानधन
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंड क्रिकेट मंडळाने मोठा निर्णय घेतला असून आता इंग्लंडच्या महिला संघाला पुरुष संघाइतकेच वेतन मिळणार आहे. यापूर्वी, इंग्लंड महिला संघाला पुरुष संघापेक्षा कमी वेतन मिळत होते, परंतु आता दोन्ही संघांना समान वेतन मिळणार आहे. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. पुरूष संघ आणि महिला संघाला समान रक्कम मिळावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ती आता पूर्ण झाली आहे. ईसीबी हे एकमेव बोर्ड नाही ज्याने पुरुष क्रिकेट संघ आणि महिला क्रिकेट संघाला समान वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने नुकताच हा निर्णय घेतला आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघांना समान फी मिळते. याशिवाय न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानेही हे पाऊल उचलले आहे. महिला क्रिकेट संघाच्या विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.