टाटा समूहाच्या एअर इंडियाने काल करार केला. एअर इंडिया आणि एअरबस यांच्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि फ्रांसचे राष्ट्रपती मॅक्रोन यांच्यात व्हर्चुअल बैठक झाल्यानंतर २५० विमान खरेदी करण्याचा करार झाला.अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रांसच्या एअरबस या कंपन्यांकडून ४७० विमाने खरेदी करण्याचा मोठा करार केला आहे.यापैकी एअरबसकडून २५० नवीन एअरक्राफ्ट आणि बोईंगकडून २२० मोठी विमाने घेण्यात येणार आहेत.











