ईआरअँडीचे मार्केट पोहोचले 4 लाख कोटींच्या घरात
वृत्तसंस्था/ मुंबई
देशाचे ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट (ईआरअँडी) ची उलाढाल जवळ 4 लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे. ग्लोबल रिसर्च इंडियाच्या टॅपलो गुपमध्ये 2016 मध्ये, ईआरअँडीची उलाढाल 85 लाख कोटी, जी 2021 मध्ये 3.4 लाख कोटी होती. 2022 मध्ये 12.67 टक्क्यांची वाढ नोंदवत 3.9 लाख कोटी रुपयेपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
साधारणपणे जगातील जवळपास प्रत्येक मोठय़ा वाहन निर्मितीमधील कंपन्या आणि ऑटो टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोवाइडर भारतामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर (आरअँडडी) केंद्र सुरु करत आहेत. बेंझ, बॉश, डेमलर, हरमन, फोर्ड मोटर्स, यासारख्या कंपन्यांसोबत मर्सिडीजचाही यामध्ये समावेश राहणार आहे. यांनी जवळपास हजारो कोटींची गुंतवणूक भारतामधील संशोधन केंद्रांकरीता केलेली असून या ठिकाणी एक लाखापेक्षा अधिकचे कर्मचारी काम करत असल्याची माहिती आहे.
ऑटोनॉमस कार बनवतात 8.5 लाख भारतीय इंजिनियर
ऑटोनॉमस कार 1 कोटीपेक्षा जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर बनवतात, असे दिसून आले आहे. 2030 पर्यंत ही संख्या 1.4 कोटीपर्यंत पोहोचणार आहे. जवळपास 30 लाख इंजीनियर्स यात असतील ज्यात 15-20 लाख भारतीय राहतील. सध्याच्या घडीला 1.1 कोटीपैकी जवळपास 8.5 लाख इंजिनियर भारतीय आहेत.
ड्रायव्हरलेस कारचे कोड भारतीयांनी बनवले
ड्रायव्हरलेस कारचे 10 कोटी कोड तयार करण्यात जवळपास 35 टक्के हिस्सा हा भारतीय इंजिनिअर्सचा आहे. नॅसकॉमचे इंजिनिअर आणि आरअँडडी कौन्सिलचे प्रमुख कार्तिकेयन नटराजन यांनी म्हटल्याप्रमाणे, ग्लोबल ऑटो कंपन्यांचे 50 ते 55 हजार इंजिनिअर अगोदरच भारतात कम करत आहेत. ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये 25,000 इंजिनिअर काम करत आहेत.
संशोधन केंद्रात भारतीयांची मागणी
क्रिसिल मार्केट इंटेलिजेंसचे संचालक हेमल ठक्कर, ईवीमध्ये (इलेक्ट्रिक उत्पानामध्ये) ऍल्युमिनिअम फोर्जिंगची गरज होती. त्यासाठी जगभरातील कंपन्या भारताकडे मागणी नोंदवत आहेत. वी फायनान्स कंपनीचे सीईओ सुमित छाजेड यांनी म्हटल्याप्रमाणे मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात भारताची संशोधन केंद्रातील गुंतवणूक 150 टक्के अधिकने वाढली आहे. संशोधन कार्यासाठी आगामी काळात होणारी गुंतवणूक भविष्यात खूपच फायद्याची ठरणार आहे.









