चंदीगड
हरियाणात भाजपला मोठा झटका बसला आहे. आदित्य चौताला यांनी भाजपला रामराम ठोकत इंडियन नॅशनल लोकदलमध्ये प्रवेश केल आहे. आयएनएलडीचे आमदार अभय सिंह चौताला यांनी आदित्य चौताला यांना पक्षात प्रवेश दिला आहे. आदित्य चौताला आता आयएनएलडीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याचे मानले जात आहे. भाजपचे आणखी मोठे नेते पक्षात सामील होणार असल्याचा दावा अभय सिंह चौताला यांनी केला आहे.









