WhatsApp News : व्हाट्सअपवर मेसेज पाठवताना अनेकदा स्पेलिंग चुकतात. किंवा घाईगडबडीत कधी-कधी चुकीचं टाईप केल जात. यामुळे वाक्याचा अर्थ बदलतो.आणि समोरच्याचा गैरसमज होतो. असं अनेकवेळा अनेकांच्या बाबतीत झालं असेल. मात्र आता काळजी करण्याचं काही काम नाही. तुम्ही पाटवलेला मेसेज तुम्हाला एडिट करता येणार आहे.व्हाट्सअपकडूनचं अशी घोषणा करण्यात आलेली आहे.
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकवर याची पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलयं की, व्हॉट्सअपवर पाठवलेला मेसेज १५ मिनिटांच्या मर्यादेत एडिट करता येईल. युजरला मेसेज एडिट करण्यासाठी पाठवेल्या मेसेजवर प्रेस करुन होल्ड करावं लागेल.त्यानंतर पुढे एक एडिट ऑप्शन दिसेल.याचा एक फायदा असा आहे की, ए़डिट केलेल्या मेसेजला एडिट असा टॅग लागणार आहे.त्यामुळे तुम्ही ए़डिट केलेले समोरच्याला कळणार आहे.
‘मेटा’च्या माहितीनुसार हे फिचर सगळ्या युजर्ससाठी देण्यात येईल.यासाठी युजर्सना वारंवार WhatsApp अपडेट करुन चेक करावं लागेल.काही दिवस आपल्याला याची वाट पाहावी लागणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









