ऑनलाईन टीम/तरुण भारत
सिंचन घोटाळ्याप्रकरणी (irrigation scam) राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांना (Ajit Pawar) क्लीन चीट मिळाली असली तरी क्लिन चीट दिल्याचा अहवाल नागपूर उच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या काही ट्विटमुळे चर्चा पुन्हा सिंचन घोटाळ्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या याच सिंचन घोटाळा प्रकरणात नवे ट्विस्ट आले आहे. या प्रकरणी विजय पांढरे (vijay pandhre) या माजी अधिकाऱ्याने मोठा आरोप केला आहे. त्यामुळे अजित पवारांसमोरील अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.जलसंपदा विभागाचे माजी अभियंते विजय पांढरे
यांनी म्हटले आहे की, भाजपचे नेते मोहित कंभोज यांनी केलेलं ट्विट महत्वाचं आहे. सिंचन घोटाळ्याची मागील १० वर्षात कोणतीच चौकशी झाली नाही. सिंचन घोटाळ्याप्रकरणी केवळ चौकशीचे व कारवाईचे नाटक करण्यात आले. सिंचन घोटाळ्याची व्याप्ती मोठा आहे व याप्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मात्र, आरोपींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
नागपूर खंडपीठासमोर परमबीर सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली होती. मात्र, खंडपीठाने ती अद्यापही मान्य केलेली नाही. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यापेक्षा सिंचन घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. तसेच चितळे समितीने सर्व गोष्टी अहवालात नमूद केले आहे, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या पाठोपाठ विजय पांढरे यांची या प्रकरणात एन्ट्री विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.








