प्रतिनिधी,सरवडे
Bidri Sugar Factory Election News : राज्यात सर्वाधिक सभासद असलेल्या व चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री तालुका कागल येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कधी होणार याकडे कार्यक्षेत्राचे लक्ष लागले होते. मात्र आज महाराष्ट्र शासनाने आदेश जारी करून या कारखान्याची निवडणूक ३० सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात लागून राहिलेली उत्सुकता संपुष्टात आली आहे.
या कारखान्याची निवडणूक पावसाळ्यामुळे पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार आज या मागणीचे आदेश शासनाने काढले आहेत. कारखान्याची प्रक्रिया सुरू असताना शासनाने आदेश काढल्याने आता या कारखान्याची रणधुमाळी ३० सप्टेंबर नंतरच पुन्हा सुरू होईल.









