न्यूयॉर्क
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला रशियाच्या अंतर्गत भागांमध्ये हल्ले करण्यासाठी दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची मंजुरी दिली आहे. या क्षेपणास्त्रांचा वापर पश्चिम रशियातील कुर्स्कमध्ये रशियन अन् उत्तर कोरियाच्या हल्ल्यांच्या विरोधात युक्रेनच्या सैन्याच्या रक्षणासाठी केला जाऊ शकतो. बिडेन यांच्या निर्णयावर रिपब्लिकन पार्टीने टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना शांतता प्रस्थापित करण्याची संधी मिळण्यापूर्वी बिडेन हे तिसरे महायुद्ध सुरू करू पाहत आहेत असा आरोप ट्रम्प ज्युनियर यांनी केला आहे.









