प्रतिनिधी / बेळगाव : गुरुवारी दुपारी पुन्हा मिलिटरी विनायक मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने सर्वांची तारांबळ उडाली. मागील २१ दिवसापासून बिबट्याने दहशद माजविली आहे. कित्येकवेळा नजरेला पडून देखील बिबट्या वनखात्याच्या हाताला लागला नाही. सोमवारी तो हातातून निसटला होता. त्यानंतर शोधमोहीम तीव्र करण्यात आली होती. आधुनिक ड्रोन कॅमेरे आणि हत्तीच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. मात्र हाती काहीच लागले नाही. दरम्यान गुरुवारी दुपारी जेसीबी च्या माध्यमातून शोध सुरु असताना तो पळून जाताना पुन्हा नजरेस पडला आहे. त्यामुळे वनखात्याची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे वनखात्याची झोप उडवलेला बिबट्या हाती लागणार का हेच आता पाहावे लागणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









