म्हैसूर येथील प्राधिकरणाच्या सदस्यांची भेट
बेळगाव : भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला मंगळवारी म्हैसूर येथील कर्नाटक प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सदस्यांनी भेट दिली. प्राधिकरणाचे सदस्य सुनील पनवार यांनी प्राणी संग्रहालयातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. तसेच काही बदल त्यांनी सुचविले आहेत. प्राणी संग्रहालयात नवीन प्राणी आणणे, तसेच नवीन व्यवस्था केली जाणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी प्राणी संग्रहालयातील सिंहाचा मृत्यू झाला होता. त्याच्याबद्दलही त्यांनी माहिती जाणून घेतली. यापुढे ते मध्यम प्राणी संग्रहालय करण्यासाठी प्राधिकरणाने प्रयत्न सुरू केले असल्याने त्यांची भेट बेळगावसाठी महत्त्वाची ठरली आहे.









