ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-मुंबईतील पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला लोणावळ्यातील भुशी डॅम ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. दरवर्षी वर्षाविहारासाठी पुणे-मुंबईतील लोक या ठिकाणी गर्दी करतात. यंदा डॅम ओव्हरफ्लो झाल्याचे समजताच स्थानिकांसह पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे.
पुणे शहर आणि उपनगरामध्ये कालपासून जोरदार पावसाची बॅटींग सुरू आहे. काल लोणावळ्यात मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद झाली. आज सकाळच्या आयएमडीच्या आकडेवारीनुसार लोणावळ्यात काल दिवसभरात 184 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला. डॅमच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत असून, या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आता गर्दी करू लागले आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी डॅम भरण्यास विलंब लागला. मात्र दोन-चार दिवसांच्या संततधार पावसाने डॅम भरून वाहू लागला आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे व्यावसाय बंद असल्याने स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली होती. यंदा मात्र, ही कसूर भरून निघणार आहे. यावेळी स्थानिक व्यावसायिकांनी धरण भरल्यानंतर देवाला साकडे घालत यावर्षीचा पर्यटन हंगाम निर्विघ्नपणे जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.








