राज्याच्या 26, 844 हजार कोटींच्या विनियोग विधेयकाला सभागृहात मंजूरी
पणजी / प्रतिनिधी
गेल्या अधिवेशनात संमत करण्यात आलेले गोवा भूमिपूत्र अधिकारिणी विधेयक सरकारने काल मागे घेतले. या विधेयकाला विरोधी पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी विरोध केला होता.
राज्याच्या विनियोग विधेयक 2023 ला काल गुरुवारी विधानसभेत मान्यता देण्यात आली. 26, 844 कोटी 40 लाख 35 हजार ऊपयांच्या खर्चाची तरतूद त्यामध्ये आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विनियोग विधेयक सादर केल्यानंतर सभागृहाने त्यास मंजूरी दिली.
अर्थसंकल्पातील योजनांची कार्यवाही करण्यासाठी निधी उपलब्ध नाही, मात्र सरकार कर्ज काढून खर्च भागवत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. तिला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की 3585 कोटीपर्यंत कर्ज घेण्याची मोकळीक असताना सरकारने फक्त 1850 कोटींचे कर्ज घेतले. हे कर्ज प्रमाणाबाहेर नाही.









