पेडणे मतदारसंघात क्रीडा मैदानांसाठी प्रयत्न करणार : आमदार प्रवीण आर्लेकर
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे मतदारसंघातील खेळाडूंना सुसज्ज अशी क्रीडा मैदाने उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून कोरगाव येथील या दुसऱया टप्प्यातील विस्तारीत क्रीडा मैदानाचे काम एका वर्षाच्या आत पूर्ण होणार आहे. पेडणे मतदारसंघातील खेळाडूनी अशा क्रीडा मैदांनाचा जास्तीत जास्त वापर करून खेळाद्वारे पेडणे मतदारसंघातील खेळाडूंनी तालुक्मयाचे नाव राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर उज्वल करावे असे आवाहन पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा हस्तकला लघु – उद्योग विकास महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर यांनी कोरगाव येथे केले .
क्रीडा खात्यातर्फे बांधण्यात येणाऱया दुसऱया टप्प्यातील विस्तारीत क्रीडा मैदानाचे आणि इंडोर मिनी स्टेडियमच्या सुमारे 4 कोटी 25 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱया क्रीडा मैदान प्राकल्पाच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर आमदार प्रवीण आलेकर बोलत होते.
यावेळी कोरगावच्या माजी सरपंच तथा विद्यमान पंच स्वाती गवंडी पंचसदस्य समीर भाटलेकर, उगवे – तांबोसे- मोप पंचायतीचे उपसरपंच सुबोध महाले , नरेश कोरगावकर सोनू गावडे, ज्योती शेटगावकर , देवानंद गावडे आदी उपस्थित होते.
या क्रीडा मैदानासाठी 4 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून हे काम एक वर्षात पूर्ण होणार आहे. या मैदानावर बॅडमिंटन खेळ, जीम तसेच अन्य खेळ खेळासाठी तरतूद केली असून या मैदानाचा आणि संकुलाचा फायदा कोरगाव पंचायत क्षेत्रातील आणि परिसरातील खेळाडूनी करून घ्यावा असे आवाहन केले. विद्यमान पंच स्वाती गवंडी यांनी विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद गावडे यांनी केले. मान्यवरांना पुष्पगुच्छ देविदास नागवेकर आणि उज्वला गावडे यांनी प्रदान केली. आभार कंत्राटदार यांनी मानले.









