न्हावेली / वार्ताहर
रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचे ॲानलाईन भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या हस्ते तर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲानलाईन पद्धतीने करण्यात आले. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, मंत्री अदिती तटकरे, तर आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली हे स्थानिक स्थानकांमध्ये उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर मळगाव स्थित सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या बाह्य परिसरामध्ये सुशोभिकरण तसेच रस्ते कॅाक्रिटीकरण व अन्य कामांचे भूमिपूजन माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बॅंक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंधावळे, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्सक्ष चंद्रकांत जाधव, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे, मळगाव सरपंच स्नेहल जामदार,उपसरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी जिल्हा परिषद सभापती गुरुनाथ पेडणेकर, सौ. शर्वाणी गावकर, माजी सभापती मानसी धुरी, पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक ॲंड. परिमल नाईक, आनंद नेवगी, प्रसन्ना कुबल, बांदा सरपंच प्रतिक्षा नाईक, उपसरपंच जावेद खतीब, भाजपचे पदाधिकारी सुधीर दळवी, शेखर गावकर, संतोष गावडे, मळगाव माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, शक्तीकेंद्रप्रमुख निळकंठ बुगडे, परिक्षित मांजरेकर, तुकाराम बर्डे, केतन आजगावकर, संदिप बांदेकर, संदिप बांदेकर,अमोल पावसकर,उदय जामदार, उदय सावळ, गुरुनाथ गावकर, मेघना साळगावकर, वंदना मडगावकर , आनंद पांढरे, वेंगुर्ला शिवसेना पदाधिकारी नितीन मांजरेकर, शासकीय ठेकेदार रोहित नाडकर्णी, भाऊ कांबळी,अजित सातार्डेकर,सहदेव सामंत,शाम सांगेलकर, यांच्यासह भाजपचे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी रोड स्थानकाच्या आज झालेल्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक अंतर्गत रस्त्याचे कॅांक्रिटीकरण फुटपाथ आर सी सी गटार संरक्षक भिंत प्रवेशद्वार कमान बस थांबा रिक्षा बागकाम व इतर सुशोभिकरण आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ६ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीपूर्वी यातील जास्तीत जास्त कामे पूर्ण करावीत अशी अपेक्षा यावेळी राजन तेली यांनी व्यक्त केली. तसेच या कामांमुळे देश विदेशातील जिल्ह्यात येणारे पर्यटक तसेच चाकरमानी यांच्यासह स्थानिक प्रवासी तसेच रिक्षा चालक मालक यांनाही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे राजन तेली यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले त्याचप्रमाणे यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार व पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे त्यांनी विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मेघना राऊळ यांनी केले.









