अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या स्वतःच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या रिसेप्शनमध्ये भूमी पेडणेकर ही यश कटारियासोबत पोहोचली होती. यश कटारिया हा बिल्डर असून त्याच्यासोबत भूमी रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. परंतु यश तसेच भूमी यांच्याकडून यावर अद्याप कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

28 वर्षीय यश कटारिया हा उद्योजक असून तो अभिनेत्री रकुल प्रीत तसेच जॅकी भगनानी यांच्यासोबत अनेकदा दिसून आला आहे. 33 वर्षीय भूमी पेडणेकरला बॉलिवूडमध्ये स्वतःच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. भूमीने 2015 मध्ये ‘दम लगा के हइशा’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिने स्वतःचे वजन वाढविले होते. या चित्रपटात ती 89 किलो वजनाची दिसून आली होती. परंतु चित्रपटानंतर तिने स्वतःचे वजन पुन्हा कमी करत अन्य भूमिका साकारल्या होत्या. ज्यातील अनेक चित्रपट गाजले होते.
भूमी यापूर्वी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात तिने कियारा अडवाणी आणि विक्की कौशल यांच्यासोबत काम केले होते. भूमी लवकरच ‘भीड’, ‘द लेडी किलर’ आणि ‘अफवाह’, ‘बेशक’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.









