बॉलिवूडचा दिगग्ज अभिनेता अनिल कपूरची मुलगी आणि निर्माती रिया कपूरने स्वत:च्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘वीरे दी वेडिंग’नंतर रिया कपूरचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. रियाने सोशल मीडियावर नव्या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला असून याचे नाव ‘थँक फॉर यू कमिंग’ असे आहे.
रियाने या चित्रपटाची तीन पोस्टर्स शेअर केली आहेत. हा चित्रपट चालू वर्षातील टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती तिने दिली आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर भूमी पेडणेकर, शहनाज गिल आणि कुशा कपिला तसेच डॉली सिंह दिसून येत आहे.
‘थँक यू फॉर कमिंग’ चित्रपटाद्वारे रिया कपूरचा पती करण बुलानी हा स्वत:चे दिग्दर्शकीय पदार्पण करणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिका शहनाज गिल, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर साकारणार आहे. या चित्रपटात डॉली अहलूवालिया, सुशांत दिवगिकर, करण कुंद्रा देखील दिसून येतील. चित्रपटाच्या पोस्टरला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. हा चित्रपट महिलाकेंद्रीत असू शकतो.









