वृत्तसंस्था/ जकार्ता
रविवार येथे झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स गोल्फ स्पर्धेत भारताचा गोल्फपटू गगनजीत भुल्लेरने अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेतील शेवटच्या फेरीत त्यांने सरासरी 67 गुणांची नोंद केली. त्याने या स्पर्धेत चार बिर्डीज नोंदविले.
आशिया गोल्फ टूरवरील भुल्लेरचे हे 11 वे विजेतेपद आहे. त्याने इंडोनेशिया खुली गोल्फ स्पर्धा 63-67-63-67 अशी 24 अंडर 260 गुण नोंदवित विजेतेपद पटकाविले. या जेतेपदामुळे आशिया टूर ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये भुल्लेरने चौथे स्थान मिळविले आहे. या जेतेपदाबरोबरच भुल्लेरने 270,000 अमेरिकन डॉलर्सची कमाई केली.









