फोंडा : देवाची करणी आणि नारळात पाणी….! ही म्हण सर्वश्रुत आहे. पण एखाद्या माडाच्या कवाथ्याचे खोड जमिनीतून बाहेर येण्यापूर्वीच त्याला मोहोर येऊन बोंडे उगवले तर हा निसर्गदेवतेचा चमत्कार नाही, तर काय म्हणणार…? सिद्धेश्वरनगर, भिले सुर्ला येथील समीर महाले यांच्या घरालगतच्या बागेत कल्पवृक्षाने अचंबित करणारे ऊप दाखविले आहे. त्याला ‘भूकल्पतऊ’ असेच म्हणावे लागेल. माड उंच वाढल्यानंतर किंवा किमान तीन चार फुट खोड आल्यानंतरच त्यावर नारळ येतात. पण समीर महाले यांच्या बागेतील हा कल्पतऊ कल्पनेपलिकडील आहे. या कवाथ्याचे खोड अजून जमिनीच्या बाहेर आलेले नाही. केवळ दिसतात त्या झावळ्या व त्यांच्या मधोमध दोन ठिकाणी मोहोराचे तुषार उगवले आहेत. त्यापैकी एकावर सुपारीच्या आकाराएवढे चार ते पाच बोंडूही उगवले आहेत. समीर महाले यांना झाडे लावण्याची व त्यांची देखभाल करण्याची मुळातच आवड असल्याने त्यांनी निसर्गाचे हे अप्रुप मोठ्या काळजीने जपले आहे. माडाचा हा कवाथाही योगायोगानेच त्यांच्या हाती लागला.
चार वर्षांपूर्वी 2019 मध्ये पर्वरी येथील एका मित्राकडून आणलेला हा कवाथा त्यांनी सुर्ल येथील आपल्या घराच्या बागेत लावला. मित्राच्या घराच्या कुंपणामध्ये शेजारील माडावऊन नारळ पडत होते. सर्वसाधारण नारळाच्या आकारापेक्षा ते जरा मोठेच असल्याने समीर यांनी त्यापासून एक कवाथा तयार कऊन देण्यास मित्राला सांगितले. मित्राकडून हा कवाथा मिळाल्यानंतर लगेच त्यांनी तो घराच्या परसबागेत लावला. या कवाथ्यासाठी ख•ाही जेमतेम दीड फुट खोदला. घरातील ओला कचरा खत म्हणून मुळावर पडू लागल्याने हा कवाथा वाढू लागला व चारही बाजुनी झावळ्या फाकून आल्या. काही दिवसांपूर्वी या झावळ्यांच्या मधोमध मोहोराचे तुषार उगवल्याचे त्यांच्या नजरेस पडले. सुऊवातीला दोन व त्यानंतर तिसराही मोहोर उगवला व त्यावर चक्क फळे वाढू लागली. सध्या एका मोहोरावर सुपारीच्या आकाराची चार ते पाच नारळांची बोंडे वाढली आहेत. हा प्रकार अचंबित करणारा असल्याने त्यांनी जुने गोवे येथील कृषीविज्ञान संस्थेच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. त्यांनीही निसर्गाचे हे अप्रुप असल्याचे सांगून या फळाची योग्य वाढ होईपर्यंत जपण्याचा सल्ला दिला. समीर यांच्या बागेत कल्पनातीत कल्पतऊ वाढत आहे व त्याची योग्य निगा राखण्याची तेवढीच मोठी जबाबदारी आता त्यांच्यावर आहे.









